Vinesh Phogat Case Dismissed: वाईट बातमी! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करणाऱ्या विनेशला रौप्यपदक मिळणार नाही, सीएएसने याचिका फेटाळली

यासह भारतीय महिला कुस्तीपटूचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे.

Vinesh Phogat: सीएएसने विनेश फोगट प्रकरणी आपला निकाल दिला आहे. सीएएसने विनेशचे अपील फेटाळले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेशने आंतरराष्ट्रीय लवाद परिषद (CAS) कडे रौप्य पदक देण्याची विनंती केली होती. यासह भारतीय महिला कुस्तीपटूचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, विनेश फोगटला 50 किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम सामन्यापूर्वी निर्धारित वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शवला होता. यानंतर विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये अपील केले. विनेशला रौप्यपदक मिळेल, अशी अपेक्षा होती पण आता ते मिळणार नाही.