Asian Games 2023: मंजू राणी-राम बाबू यांना कांस्यपदक, भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेमधील सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी

यावेळीही भारताने 15 सुवर्णांसह 70 पदके जिंकली आहेत. अशा स्थितीत यावेळी भारताला 100 पदके मिळण्याची पूर्ण आशा आहे.

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने मिश्र 35 किमी शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. चीनला सुवर्ण तर जपानला रौप्यपदक मिळाले. या पदकासह भारताची एकूण पदकतालिका 70 वर पोहोचली असून भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली आहे. 2018 मध्ये भारताने 16 सुवर्णांसह 70 पदके जिंकली. यावेळीही भारताने 15 सुवर्णांसह 70 पदके जिंकली आहेत. अशा स्थितीत यावेळी भारताला 100 पदके मिळण्याची पूर्ण आशा आहे.

पाहा पोस्ट -