Asian Games 2023: भारतीय धावपटू Parul Chaudhary ने 5000 मीटरमध्ये जिंकले सुवर्णपदक

त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 14 सुवर्णपदके जिंकली आहेत.

Parul Chaudhary (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाची चमकदार कामगिरी सुरूच आहे. गेल्या नऊ दिवसांत भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्णांसह एकूण 60 पदके जिंकली आहेत. आजही हे सत्र चालूच आहे. आता महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. पारुल चौधरीने देशाला हे पदक मिळवून दिले. तिने शर्यतीच्या शेवटच्या काही मीटर्समध्ये जपानी खेळाडूला मागे टाकले आणि सुवर्णपदक जिंकले. अशा प्रकारे भारताच्या पदकांची संख्या 64 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 14 सुवर्णपदके जिंकली आहेत. (हेही वाचा: Asian Games 2023: Vithya Ramraj ने Women’s 400m Hurdles स्पर्धेत जिंकलं कांस्य पदक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)