Asian Games 2023: 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेने पटकावले 'गोल्ड'
सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या 38 पर्यंत पोहचली आहे.
महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. एथलेटिक्स स्पर्धांमधलं (Asian Games) भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. अविनाशच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. तर आता भारताच्या खात्यात सुवर्ण पदकांची संख्येत वाढ झाली आहे. सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या 38 पर्यंत पोहचली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)