Asian Games 2023: भारतीय बॅडमिंटन संघाचा चीनविरुद्ध पराभव, रौप्यपदकावर मानावे लागले समाधान

या स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली आणि पहिल्या 2 सामन्यात शानदार विजय नोंदवला. यानंतर चीनने जोरदार पुनरागमन करत पुढील तीन सामने जिंकून भारताचा पराभव केला.

Badminton

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे सुवर्णपदक हुकले. भारतीय बॅडमिंटन संघाला सुवर्णपदकाच्या लढतीत चीनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली आणि पहिल्या 2 सामन्यात शानदार विजय नोंदवला. यानंतर चीनने जोरदार पुनरागमन करत पुढील तीन सामने जिंकून भारताचा पराभव केला. भारताने शानदार झुंज दिली आणि पहिले 2 सामने जिंकले पण फायनलमध्ये चीनविरुद्ध पुढील 3 गेम गमावले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील बॅडमिंटनमधील भारतीय संघाचे हे पहिले रौप्यपदक आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement