Commonwealth Games 2022: भालाफेकमध्ये भारताला पहिले पदक, भालाफेकपटू अन्नू राणीने पटकावले कांस्यपदक
अन्नूने CWG 2022 मध्ये 60 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.
भारताच्या 29 वर्षीय भालाफेकपटू अन्नू राणीने (Annu Rani) CWG च्या इतिहासात महिलांच्या भालाफेकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देऊन इतिहास रचला. अन्नूने CWG 2022 मध्ये 60 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले. दरम्यान, आणखी एक भारतीय भालाफेकपटू शिल्पा राणीने या स्पर्धेत सातवे स्थान पटकावले. राणीने 55.61 मीटरचा पहिला थ्रो नोंदवल्यामुळे सुरुवातीला या स्पर्धेत मागे राहिली. इतर दोन थ्रो अपात्र ठरले. चौथ्या प्रयत्नात राणीने जबरदस्त थ्रो मारत थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)