Commonwealth Games 2022: भालाफेकमध्ये भारताला पहिले पदक, भालाफेकपटू अन्नू राणीने पटकावले कांस्यपदक

अन्नूने CWG 2022 मध्ये 60 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.

Commonwealth Games 2022: भालाफेकमध्ये भारताला पहिले पदक, भालाफेकपटू अन्नू राणीने पटकावले कांस्यपदक
Annu Rani (PC - Twitter)

भारताच्या 29 वर्षीय भालाफेकपटू अन्नू राणीने (Annu Rani) CWG च्या इतिहासात महिलांच्या भालाफेकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देऊन इतिहास रचला.  अन्नूने CWG 2022 मध्ये 60 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले. दरम्यान, आणखी एक भारतीय भालाफेकपटू शिल्पा राणीने या स्पर्धेत सातवे स्थान पटकावले.  राणीने 55.61 मीटरचा पहिला थ्रो नोंदवल्यामुळे सुरुवातीला या स्पर्धेत मागे राहिली.  इतर दोन थ्रो अपात्र ठरले. चौथ्या प्रयत्नात राणीने जबरदस्त थ्रो मारत थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2022 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).