Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात भारताची विजयाने सुरुवात, पहिल्या सामन्यात स्पेनचा 2-0 ने पराभव

या सामन्यात टीम इंडियासमोर स्पेनचा संघ होता. त्याचबरोबर या सामन्यात भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव केला. भारताकडून स्थानिक खेळाडू अमित रोहिदासने गोल केला.

हिंदूस्थान हॉकी संघ (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारतातील ओडिशा येथे हॉकी विश्वचषकाचे सामने सुरू आहेत. आज भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात टीम इंडियासमोर स्पेनचा संघ होता. त्याचबरोबर या सामन्यात भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव केला. भारताकडून स्थानिक खेळाडू अमित रोहिदासने गोल केला. त्याचवेळी हार्दिक सिंगने भारतासाठी दुसरा गोल केला. दोन्ही संघांमधील हा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघ पूल-डीमध्ये आहे. भारत आणि स्पेन व्यतिरिक्त इंग्लंड आणि वेल्स देखील या पूलमध्ये आहेत. हेही वाचा Veda Krishnamurthy Marriage: भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ती अडकली विवाहबंधनात, पहा फोटो

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement