IND vs WI: भारताने वेस्ट इंडिजला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात चारली पराभवाची धुळ, पहा Highlights

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा तीन धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Team India (PC - Twitter)

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा तीन धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारताने कर्णधार शिखर धवनने 99 चेंडूत 97 धावा केल्या. भारताने 7 बाद 308 धावा केल्या. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अनुक्रमे 64 आणि 54 धावा केल्या. विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 50 षटकांत 6 बाद 305 धावाच करता आल्या. घरच्या संघाकडून काईल मेयर्सने सर्वाधिक 75 धावा केल्या, तर शमारह ब्रूक्स आणि ब्रँडन किंग यांनी अनुक्रमे 46 आणि 54 धावा केल्या.भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पहा हायलाइट्स

https://www.fancode.com/cricket/videos/lastball-thriller-ind-beat-wi-by-3-runs/35268?utm_source=google&utm_medium=onebox&utm_campaign=WIvsIND-2022&utm_term=highlights

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement