महिला क्रिकेटर Rajshree Swain चा मृत्यू, जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

कटकचे पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, अथागढ भागातील गुरुडिझाटिया जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

Rajshree Swain

ओडिशाची (Odisha) महिला क्रिकेटर राजश्री स्वेन (Rajshree Swain) शुक्रवारी कटक (Katak) शहराजवळील घनदाट जंगलात मृतावस्थेत आढळून आली, असे पोलिसांनी सांगितले. 11 जानेवारीपासून ती बेपत्ता होती. कटकचे पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, अथागढ भागातील गुरुडिझाटिया जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तिच्या प्रशिक्षकाने गुरुवारी कटकमधील मंगलाबाग पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुरुडीझहाटिया पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात येणार आहे. हेही वाचा Rahul Dravid Unwell: राहुल द्रविडच्या प्रकृतीत बिघाड, भारत-श्रीलंकामधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहणार अनुपस्थित

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now