Zaheer Khan Joins Lucknow Super Giants: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! झहीर खान लखनऊ संघात सामील, मेगा लिलावापूर्वी मिळाली मोठी जबाबदारी

तो 2018 ते 2022 पर्यंत पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससोबत होता. झहीर लखनऊ संघात सामील होणार असल्याची चर्चा तीन-चार दिवसांपासून सुरू होती. मात्र त्याची पुष्टी होत नव्हती. आता लखनौ फ्रँचायझीने ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Zaheer Khan At LSG (Photo Credit - X)

IPL 2025: झहीर खानबाबत (Zaheer Khan) सुरू असलेल्या अटकळांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज आता इंडियन प्रीमियर लीग संघ लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) मार्गदर्शक बनला आहे. 45 वर्षीय झहीर दोन वर्षांनी आयपीएलमध्ये परतणार आहे. तो 2018 ते 2022 पर्यंत पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससोबत होता. झहीर लखनऊ संघात सामील होणार असल्याची चर्चा तीन-चार दिवसांपासून सुरू होती. मात्र त्याची पुष्टी होत नव्हती. आता लखनऊ फ्रँचायझीने ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लखनऊ फ्रँचायझीने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले – झहीर, तू खूप दिवसांपासून लखनऊच्या हृदयात आहेस. यासोबतच एक फोटो देखील पोस्ट करण्यात आले होते ज्यामध्ये संघाचे मालक संजीव गोयंका लखनऊची जर्सी झहीरला देत आहेत ज्यावर त्याचे नाव आणि नंबर (34) लिहिलेला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)