ICC ने U19 विश्वचषक 2022 चा ‘सर्वात मौल्यवान’ संघ निवडला; यश धुलच्या हाती संघाची कमान, तर तीन भारतीयांसह ‘या’ खेळाडूंना देण्यात आले स्थान
भारताने विक्रमी 5 वी ट्रॉफी उंचावल्याच्या काही तासांनंतर यश धुलला आयसीसी U19 विश्वचषक ‘सर्वात मौल्यवान’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. ICC ने रविवारी घोषित केलेल्या अंडर-19 विश्वचषक संघात तब्बल 3 भारतीयांनी स्थान मिळवले आहे. यशच्या नेतृत्वात भारताच्या युवा ब्रिगेडने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली.
भारताने (India) अँटिग्वा येथे विक्रमी 5 वी ट्रॉफी उंचावल्याच्या काही तासांनंतर यश धुलला (Yash Dhull) आयसीसी U19 विश्वचषक ‘सर्वात मौल्यवान’ संघाचा (Most Valuable Team) कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. ICC ने रविवारी घोषित केलेल्या अंडर-19 विश्वचषक संघात तब्बल 3 भारतीयांनी स्थान मिळवले आहे. यश व्यतिरिक्त डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल आणि अष्टपैलू राज बावा हे देखील संघात आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)