WTC Point Table Update: दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताचे मोठे नुकसान, न्यूझीलंडने पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप

तर भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक स्थान गमावले आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

WTC Point Table Update: दक्षिण आफ्रिका सध्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 281 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह, न्यूझीलंडने मोठी झेप घेतली आहे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे. तर न्यूझीलंडच्या विजयानंतर भारताला टॉप 2 मधून बाहेर पडावे लागले. न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक स्थान गमावले आहे. न्यूझीलंड सध्या गुणतालिकेत 66.66 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 55 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. आस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 10 सामने खेळले आहेत, ज्यात 6 जिंकले आहेत. तर भारत 6 पैकी 3 सामने जिंकून 52.77 गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (हे देखील वाचा: Rajkot Stadium New Name: बीसीसीआयची मोठी घोषणा, तिसऱ्या कसोटीपूर्वी राजकोट स्टेडियमचे नाव बदलणार)

With a massive 281-run victory against South Africa, New Zealand claims the top spot in the latest WTC Points table. 🇳🇿🔥#NZvSA #Cricket #NewZealand #Sportskeeda pic.twitter.com/X2ltLFaFDQ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif