Chris Gayle Dance Video: ख्रिस गेलचा गुजरात जायंट्सच्या नवरात्रीच्या उत्सवात गरबा डान्स पाहून व्हाल थक्क (Watch Video)
मात्र त्याआधी गरबा नाईटमध्ये टीमचे सर्व खेळाडू खास पद्धतीने नवरात्र साजरे करताना दिसले.
वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) केवळ त्याच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या राहणीमानानेही लोकांना भुरळ घातली आहे. सध्या गेल लिजेंड्स लीगमधील गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाचा भाग आहे. सेहवागच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत आणि सोमवारी त्यांचा एलिमिनेटर सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी गरबा नाईटमध्ये टीमचे सर्व खेळाडू खास पद्धतीने नवरात्र साजरे करताना दिसले. या रात्री, सेहवाग आणि ख्रिस गेलसह इतर सहकारी देखील शानदार कपड्यांमध्ये दिसले. त्याचवेळी ख्रिस गेलच्या जबलदस्त डान्सने सर्वांनाच थक्क केले. गुजरात जायंट्सने गेलच्या या फनी डान्सचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)