DC vs SRH: वॉशिंग्टन सुंदरने असे मोडले दिल्लीचे कंबरडे, 1 ओव्हरमध्ये घेतल्या तीन विकेट (Watch Video)

दिल्लीने वेगवान सुरुवात करताच पहिल्या 6 षटकांत 2 गडी गमावून 49 धावा केल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 3 विकेट घेत दिल्लीचे कंबरडे मोडले.

आयपीएल 2023 (IPL 2023) चा 34 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने वेगवान सुरुवात करताच पहिल्या 6 षटकांत 2 गडी गमावून 49 धावा केल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 3 विकेट घेत दिल्लीचे कंबरडे मोडले. वॉशिंग्टन सुंदरने आठव्या षटकात दिल्लीचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान आणि अमन खान यांची शिकार केली. या षटकात त्याने केवळ 5 धावा दिल्या आणि 3 विकेट घेत दिल्लीला बॅकफूटवर आणले. या षटकापासून हैदराबाद संघाने सामन्यात दिल्ली संघावर वर्चस्व राखले आहे. हे षटकही सामन्याचे टर्निंग पॉइंट ठरू शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now