Virat Kohli New Home Video: अलिबागमध्ये विराट कोहलीचा आलिशान बंगला झाला तयार; व्हिडिओ शेअर करून दाखवली घराची झलक (Watch Video)

आमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणल्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. माझ्या प्रियजनांसोबत येथे प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी मी आतुर आहे.'

Virat Kohli New Home Video (PC - X/@imVkohli)

Virat Kohli New Home Video: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चा अलिबाग (Alibaug) येथील बंगला पूर्णपणे तयार झाला आहे. कोहलीने पोस्ट शेअर करून त्याची झलक दाखवली आहे. विराटने पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अलीबागमध्ये आमचे घर बांधण्याचा प्रवास हा एक नितळ अनुभव होता. आमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणल्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. माझ्या प्रियजनांसोबत येथे प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी मी आतुर आहे.' कोहलीच्या नवीन घराचा व्हिडिओ पाहून चाहते रोमांचित झाले आहेत. विराट कोहलीच्या अलिबागमधील बंगल्याची किंमत कोटींमध्ये आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, या बंगल्याची किंमत 13 कोटी रुपये आहे. कोहलीच्या या बंगल्यात सर्व सुविधा आहेत. (हेही वाचा - FIR Filed Against Virat Kohli's Pub In Bengaluru: बेंगळुरूमध्ये विराट कोहलीच्या पबवर FIR दाखल; 'या' कारणामुळे करण्यात आली कारवाई)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)