Virat Kohli Thanks Mumbai Police: जय हिंद... हजारोंच्या गर्दीला सहज हाताळले, विराट कोहलीने मुंबई पोलिसांचे आभार मानले

संघाची विजयी परेड नरिमन पॉइंटपासून मरीन ड्राइव्हच्या बाजूने वानखेडे स्टेडियमपर्यंत झाली आणि टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्सची झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते आले.

Photo Credit - X

Team India Vectory Parade: भारताचा टी-20 विश्वचषक विजय परेड सुरळीतपणे पार पाडण्यासाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. गुरुवारी संध्याकाळी लाखो मुंबईकरांनी टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या उत्साही सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. संघाची विजयी परेड नरिमन पॉइंटपासून मरीन ड्राइव्हच्या बाजूने वानखेडे स्टेडियमपर्यंत झाली आणि टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्सची झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते आले. विराट कोहलीने ट्विट करत लिहिले की, 'टीम इंडियाच्या विजयाच्या परेडमध्ये अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून आदर आणि धन्यवाद. तुमचे समर्पण आणि सेवा खूप कौतुकास्पद आहे. जय हिंद.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)