युवराज सिंह याच्याबद्दल Virat Kohli याची खास पोस्ट, हस्ताक्षरातील संदेशासह ‘गोल्डन बूट’ भेट दिल्याबद्दल मानले विशेष आभार (See Post)
भारताच्या माजी अष्टपैलू आणि वर्ल्ड कप विजेता खेळाडूकडून हस्तलिखीत नोट आणि बूट मिळाल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने युवराज सिंह याच्यासाठी एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ते दोघे 9 वर्षे टीम इंडियामध्ये सहकारी होते आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रांचायझीकडून एक वर्षासाठी आयपीएल स्पर्धेत एकत्र खेळले.
विराट कोहलीने (Virat Kohli) आपला माजी टीम इंडिया सहकारी युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्या पोस्टला प्रतिसाद दिला आहे आणि त्याच्या ‘युवी पा’चे आभार मानले आहेत. कोहलीने इंस्टाग्रामवर खास ‘गोल्डन बूटा’चा फोटो आणि माजी अष्टपैलू खेळाडूच्या हस्तलिखित नोटसह युवराजसाठी खास पोस्ट शेअर केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)