Virat Kohli की MS Dhoni? Gautami Patil कोणाची आहे जबरी फॅन? व्हिडिओ पाहुन तुम्हीच घ्या जाणून
That Odd Engineer या युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत गौतमीला तिच्या आवडत्या आयपीएल टीमबाबत प्रश्न विचारण्यात आला तसेच आवडत्या खाद्यपदार्थाबाबत देखील तिला विचारण्यात आलं.
सध्या आयपीएलचा क्रेझ चालु आहे आणि त्यामध्ये आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील चर्चेत आली आहे. गौतमीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. That Odd Engineer या युट्यूब चॅनलनं गौतमी पाटीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गौतमीला विविध विषयांबाबत प्रश्न विचारण्यात आले. That Odd Engineer या युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत गौतमीला तिच्या आवडत्या आयपीएल टीमबाबत प्रश्न विचारण्यात आला तसेच आवडत्या खाद्यपदार्थाबाबत देखील तिला विचारण्यात आलं. गौतमीला पुरणपोळी की तांबडा पांढरा? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला गौतमीनं पुरणपोळी असं उत्तर दिलं. विराट कोहली की धोनी? असा ही प्रश्न या मुलाखतीत गौतमीला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर गौतमीनं धोनी हे दिलं. मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपरकिंग्स यापैकी आयपीएलमधील आवडता संघ कोणता? असाही प्रश्न गौतमीला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर गौतमीनं मुंबई इंडियन्स असं दिलं. गौतमीच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)