Security Breach: खेळाडूंच्या सुरक्षेचा भंग, विराट कोहली राहत असलेल्या हॉटेलमधून तीन हिस्ट्री शीटर्सला अटक
सामन्यासाठी आरसीबीच्या विराट कोहलीसह अनेक प्रसिद्ध खेळाडू आयटी पार्कमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबले होते. तीन हिस्ट्री शीटर्सनीही याच हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या.
आयपीएल 2023 (IPL 2023) दरम्यान, खेळाडूंच्या सुरक्षेचा भंग झाल्याची घटना समोर आली आहे, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना 20 एप्रिल रोजी मोहालीमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात आरसीबीने 24 धावांनी विजय मिळवला. सामन्यासाठी आरसीबीच्या विराट कोहलीसह अनेक प्रसिद्ध खेळाडू आयटी पार्कमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबले होते. तीन हिस्ट्री शीटर्सनीही याच हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या. तिघेही तिथे आरामात राहत होते. मात्र तत्परता दाखवत पोलिसांनी तीनही आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाईत अटक केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)