Vijay Hazare 2021-22: दिनेश कार्तिक आणि वॉशिंग्टन सुंदरचे तामिळनाडू संघात पुनरागमन, शाहरुख खानचीही संघात निवड
तामिळनाडूने मंगळवारी विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी शाहरुख खान, अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचा 20 सदस्यीय संघात समावेश केला. शाहरुखने सोमवारी अरुण जेटली स्टेडियमवर शेवटच्या चेंडूवर षटकार मारून तमिळनाडूला सय्यद मुश्ताक अली टी-20 चॅम्पियन बनवले होते.
तामिळनाडूने (Tamil Nadu) मंगळवारी विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेसाठी शाहरुख खान (Shahrukh Khan), अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder( यांचा 20 सदस्यीय संघात समावेश केला. तामिळनाडूला एलिट गट ब मध्ये ठेवण्यात आले आहे आणि संघ तिरुवनंतपुरम येथे 8 डिसेंबरला मुंबईविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. संघाचे नेतृत्व अष्टपैलू विजय शंकर करणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)