BCCI Media Rights: पुढील पाच वर्षांसाठी वायकॉम-18 ने बीसीसीआयचे मीडिया राईट्स घेतले विकत, आता Jio वर पाहणार भारतीय सामने

बीसीसीआयने सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 या कालावधीत नवीन सायकलसाठी मीडिया अधिकारांचा लिलाव आयोजित केला होता.

Viacom18

BCCI Media Rights: रिलायन्स ग्रुपच्या वायकॉम 18 ने पुढील 5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मीडिया राईट्स विकत घेतले आहे. बीसीसीआयने सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 या कालावधीत नवीन सायकलसाठी मीडिया अधिकारांचा लिलाव आयोजित केला होता. पीटीआयच्या माहितीनुसार, हे अधिकार मिळवण्यात वायाकॉम 18 ने विजय मिळवला आहे. या शर्यतीत असलेल्या डिस्ने-स्टार आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कला आपल्या बोलीने पराभूत केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)