Harbhajan Singh Retires from Cricket: हरभजन सिंह याची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ‘टर्बनेटर’ने वयाच्या 41 व्या वर्षी क्रिकेटला म्हटले अलविदा

Harbhajan Singh Retires: जेंटलमेन्स गेम खेळणाऱ्या आतापर्यंतच्या महान भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक, हरभजन सिंहने शुक्रवारी निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक 2001 बॉर्डर-गावस्कर मालिकेतील त्याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या प्रदर्शनासाठी हरभजनला स्मरणात ठेवले जाते. हरभजनने 417 टेस्ट विकेट घेतल्या, जे सध्या भारतीय गोलंदाजाच्या चौथ्या सर्वाधिक विकेट्स आहेत.

हरभजन सिंह (Photo Credit: Getty)

Harbhajan Singh Retires: भारताचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंहने (Harbhajan Singh) शुक्रवारी सोशल मीडियावर सर्व स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. उल्लेखनीय म्हणजे, भज्जी कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे. तसेच 2007 (T20) आणि 2011 वनडे ऐतिहासिक विश्वचषक विजयाचा भाग असलेल्या काही खेळाडूंमध्ये भज्जीचा समावेश होतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now