VEL vs TBL, WT20 Challenge 2022: मेघना, जेमिमाहने वेलोसिटी गोलंदाजांनी उडवली दाणादाण, ट्रेलब्लेझर्सने उभारला 190 धावांचा एव्हरेस्ट
VEL vs TRL, Women's T20 Challenge: वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यातील महिला टी-20 चॅलेंज सामन्यात स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 190 धावा केल्या आणि वेलोसिटी संघाला 191 धावांचे भव्य लक्ष्य मिळाले आहे. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील आतापर्यंत संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
VEL vs TBL, WT20 Challenge 2022: वेलोसिटी (Velocity) आणि ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) यांच्यातील महिला टी-20 चॅलेंजचा (Women's T20 Challenge) तिसरा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. ट्रेलब्लेझर्स संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 190 धावा केल्या आणि वेलोसिटी संघाला 191 धावांचे भव्य लक्ष्य मिळाले आहे. सलामीवीर मेघनाने (Meghana) सर्वाधिक 73 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचवेळी जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. जेमिमाने 44 चेंडूत 66 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)