RR vs PBKS, IPL 2024 Live Streaming: आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यांत होणार लढत, एका क्लिकवर जाणून घ्या कधी पाहणार सामना

राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे. आता त्यांना पंजाब किंग्ज आणि केकेआरविरुद्ध आपले उर्वरित सामने खेळायचे आहेत.

RR vs PBKS, IPL 2024 Live Streaming: आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यांत होणार लढत, एका क्लिकवर जाणून घ्या कधी पाहणार सामना
RR vs PBKS (Photo Credit - Twitter)

RR vs PBKS, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 65 वा सामना (IPL 2024) राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात होणार आहे. गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्ससाठी आतापर्यंतचा हा मोसम चांगला गेला आहे. राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे. आता त्यांना पंजाब किंग्ज आणि केकेआरविरुद्ध आपले उर्वरित सामने खेळायचे आहेत. राजस्थान रॉयल्सने या मोसमात 12 सामने खेळले आहेत. या कालावधीत राजस्थान रॉयल्सने 8 सामने जिंकले असून 4 सामने गमावले आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 4 जिंकले आहेत आणि 8 गमावले आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).