Tirupati-CSK Special Pooja of IPL Trophy: आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने तिरुपती मंदिरात केली विशेष पूजा, Watch Video

आयपीएल 2023 ची ट्रॉफी भगवान व्यंकटेश्वराच्या कमळाच्या चरणी ठेवण्यात आली आणि विशेष पूजा करण्यात आली. अहमदाबादमध्ये पावसाने भिजलेल्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सवर विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.

Tirupati-CSK Special Pooja of IPL Trophy

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 ची ट्रॉफी जिंकल्याच्या एका दिवसानंतर. चेन्नईमधील तिरुपती मंदिरात याबाबत एक विशेष पूजा करण्यात आली. चेन्नईतील टी नगरच्या वेंकटनारायण रोड येथील तिरुमला तिरुपती देवस्थानम भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात ही बहुमोल ट्रॉफी आणली गेली. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रॉफी थेट टी नगर येथील टीटीडी मंदिरात आणण्यात आली. टीटीडीच्या तामिळनाडू आणि पुद्दुचेरी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष  एआय शेखर रेड्डी, माजी अध्यक्ष श्री कृष्णा आणि इतर सदस्यांनी सीएसके प्रतिनिधींचे अभिनंदन केले आणि मुख्य मंदिर परिसरात त्यांचे औपचारिक स्वागत केले. त्यानंतर आयपीएल 2023 ची ट्रॉफी भगवान व्यंकटेश्वराच्या कमळाच्या चरणी ठेवण्यात आली आणि विशेष पूजा करण्यात आली. अहमदाबादमध्ये पावसाने भिजलेल्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सवर विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. (हेही वाचा: चेन्नई जिंकली, दिपक चहर याचा आनंद गगनात मावेना, ढोल-ताशांच्या तालावर डान्स; व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now