Tilak Varma Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात तिलक वर्माने ठोकले पहिले आंतरराष्ट्रीय शतक
सध्या भारताची धवसंख्या ही 19 षटकानंतर भारताची धावसंख्या 5 बाद 215 अशी आहे. तिलक वर्मा हा 8 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 53 चेंडूत 106 धावाकरून खेळत आहे.
South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 3rd T20I Match Live Score Update: : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा (Team India) सात विकेट्सने पराभव केला. यासह टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या (Aiden Markram) खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे. या सामन्यात पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर टीम इंडियाचा डाव अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माने सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकीय भागिदारी केली. पंरतू अभिषेक 50 धावा करून बाद झाल्यावरही तिलकने भारताची एक बाजू लढवत राहिला, सध्या भारताची धवसंख्या ही 19 षटकानंतर भारताची धावसंख्या 5 बाद 215 अशी आहे. तिलक वर्मा हा 8 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 53 चेंडूत 106 धावाकरून खेळत आहे.
पाहा पोस्ट -
💯 𝗳𝗼𝗿 𝗧𝗶𝗹𝗮𝗸 𝗩𝗮𝗿𝗺𝗮! 👏 👏
His 1⃣st in international cricket 👌 👌
This has been a 🔝 knock! 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/JBwOUCgZx8#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/lZPf4oBwc7
— BCCI (@BCCI) November 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2024 10:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

