Hardik Pandya Out or Not Out: हार्दिक पांड्याला थर्ड अंपायरने दिले चुकीचे आऊट! चाहत्यांनी ट्विटरवर घातला गोंधळ, पहा ट्विट

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या.

Hardik Pandya Out or Not Out: हार्दिक पांड्याला थर्ड अंपायरने दिले चुकीचे आऊट! चाहत्यांनी ट्विटरवर घातला गोंधळ, पहा ट्विट
Photo Credit - Twitter

IND vs NZ 1st ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 350 धावा करायच्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाला पाचवा मोठा धक्का हार्दिक पांड्याच्या रूपाने बसला, जो 38 चेंडूत 28 धावा करत लॉकी डॅरिल मिशेलचा बळी ठरला. ज्यामध्ये थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर क्लास घ्यायला सुरुवात केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2023 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).