India A vs India B, Duleep Trophy 2024 Day 2 Stumps: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत ब संघाने 240 धावांची घेतली आघाडी; येथे पाहा स्कोअरकार्ड
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ब संघाने 31.3 षटकांत सहा गडी गमावून 150 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर 6 धावा करून खेळत आहे. तत्पूर्वी, भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत ब संघाची सुरुवात काही खास नव्हती.
India A vs India B Cricket Team Match Scorecard Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना भारत अ विरुद्ध भारत ब यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ब संघाने 31.3 षटकांत सहा गडी गमावून 150 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर 6 धावा करून खेळत आहे. तत्पूर्वी, भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत ब संघाची सुरुवात काही खास नव्हती. भारत ब संघाचा पहिला डाव 116 षटकात 321 धावांवर संपुष्टात आला. भारत ब संघाकडून मुशीर खानने सर्वाधिक 181 धावांची खेळी केली. तर भारत अ संघाकडून आकाश दीपने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारत अ संघाचा पहिला डाव 72.4 षटकांत 231 धावांवरच आटोपला. भारत ब संघाकडून सलामीवीर मयंक अग्रवालने सर्वाधिक 36 धावा केल्या. भारत अ संघाकडून नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.