KKR vs RR, IPL 2024 Live Score Update: राजस्थानला बसला तिसरा धक्का, पराग 34 धावा करून बाद झाला, बटलर क्रीझवर उपस्थित होता.
राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने राजस्थानसमोर 224 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरकडून सुनील नरेनने 109 धावांची खेळी खेळली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.
KKR vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 मधील 31 वा सामना (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने राजस्थानसमोर 224 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरकडून सुनील नरेनने 109 धावांची खेळी खेळली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. नरेननंतर आंगकृष्ण रघुवंशीने सर्वाधिक 30 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंग 9 चेंडूत 20 धावा काढून नाबाद परतला. रिंकूने एक चौकार आणि दोन षटकार मारले. तर राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थाला तिसरा धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 97/3
Match 31. WICKET! 7.5: Riyan Parag 34(14) ct Andre Russell b Harshit Rana, Rajasthan Royals 97/3 https://t.co/13s3GZLlAZ #TATAIPL #IPL2024 #KKRvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2024 10:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

