IND vs BAN 2nd Test Live Score Update: शांतोला बाद करत आर अश्विनने मोठा मासा पकडला, भारताचे तिसरे यश

टीम इंडिया सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्याचबरोबर हा सामना बांगलादेशसाठीही खूप महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे.

IND vs BAN 2nd Test Live Score Update: शांतोला बाद करत आर अश्विनने मोठा मासा पकडला, भारताचे तिसरे यश
Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्याचबरोबर हा सामना बांगलादेशसाठीही खूप महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशला तिसरा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 80/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2024 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).