इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 45 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्या लखनौ सुपर जायंट्स संघाला तिसरा मोठा धक्का बसला. लखनौ सुपर जायंट्सचा संघ स्कोअर 27/3 आहे.
Match 45. WICKET! 5.5: Krunal Pandya 0(1) ct Ajinkya Rahane b Maheesh Theekshana, Lucknow Super Giants 27/3 https://t.co/QwaagO40CB #TATAIPL #LSGvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)