Team India Victory Parade: ठरलं तर! मुंबई पुन्हा एकदा थांबणार, विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपनडेक बसमधून निघणार विजयी मिरवणुक; जय शाह यांची माहिती
तुम्हाला आठवत असेल, 2007 मध्ये भारत जगज्जेता झाला तेव्हा भारतीय संघ मुंबईच्या रस्त्यावर उतरला होता आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो जल्लोष मुंबईच्या रस्त्यावर पाहता येणार आहे.
बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. चक्रीवादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली असली तरी आता सर्व खेळाडू उद्या सकाळी आपल्या देशात परतणार आहेत. तुम्हाला आठवत असेल, 2007 मध्ये भारत जगज्जेता झाला तेव्हा भारतीय संघ मुंबईच्या रस्त्यावर उतरला होता आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो जल्लोष मुंबईच्या रस्त्यावर पाहता येणार आहे. उद्या दिल्लीत उतरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहे. पीएम मोदींसोबत नाश्ता केल्यानंतर टीम मुंबईला (Mumbai) रवाना होईल, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. मुंबईत संध्याकाळी 5 वाजता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. जय शाह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)