India vs Bangladesh Match Schedule: टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्यांची तारीख जाहीर; 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक पहा
Team India-Bangladesh Match Schedule: टीम इंडियाच्या बांगलादेश (India vs Bangladesh)दौऱ्यांची तारीख जाहीर झाली आहे. बीसीसीआयने त्यांच्या एक्स हॅंडलवर त्याबाबतची माहिती दिली. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय सामन्यांपासून मालिकेची सुरूवात होईल. 17, 20, 23 ऑगस्ट या दिवशी तीन एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. तर, 26, 29, 31 रोजी टी 20 मालिका खेळवली जाईल. हे सर्व सामने मीरपूर आणि चित्तोग्राम येथे खेळवले जातील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)