Team India T20I Squad: बांग्लादेश विरूद्धच्या T20 मालिकेसाठी संघाची घोषणा; SKY करणार नेतृत्व तर नितीश कुमार रेड्डीला मिळाली संधी
सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळाली आहे. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तेज गोलंदाज मयांक यादवला देखील संघात स्थान मिळाले आहे.
Team India T20I Squad Announced: भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदात सूर्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळाल्यामुळे त्यांना सलामीची संधी मिळू शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळाली आहे. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तेज गोलंदाज मयांक यादवला देखील संघात स्थान मिळाले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)