Virat Kohli At Mumbai Airport: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली अमेरिकेला रवाना, मुंबई विमानतळावर दिसला; पाह व्हिडिओ

यावेळी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. टीम इंडियानेही न्यूयॉर्कला पोहोचून सराव सुरू केला आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना आयर्लंडसोबत खेळणार आहे.

ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ची (ICC T20 World Cup 2024) तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आता विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. टीम इंडियानेही न्यूयॉर्कला पोहोचून सराव सुरू केला आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना आयर्लंडसोबत खेळणार आहे. टीम इंडियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडियासह पाकिस्तान आणि आयर्लंडला अ गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात 5 जून रोजी सामना होणार आहे. टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी विराट कोहली विमानतळावर एका चाहत्याला ऑटोग्राफ देताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)