IND vs AFG 3rd T20I Toss Update: भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; सॅमसन, कुलदीप आणि आवेश खानला मिळाली संधी

भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकून अफगाणिस्तानचा सफाया करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. त्याचबरोबर अफगाण संघाला विजयासह मालिका संपवायची आहे.

IND vs AFG 3rd T20I Toss Update: भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; सॅमसन, कुलदीप आणि आवेश खानला मिळाली संधी
IND vs AFG (Photo Credit - Twitter)

IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील टी-20 मालिकेतील (T20I Series) तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मालिकेच्या दृष्टीने या सामन्याला महत्त्व नाही. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकून अफगाणिस्तानचा सफाया करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. त्याचबरोबर अफगाण संघाला विजयासह मालिका संपवायची आहे. अफगाणिस्तान अजूनही कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (डब्ल्यू), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2024 06:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).