IND vs AUS 4th Test Live Streaming Online: टीम इंडियाच्या नजरा असतील मालिका जिंकण्यावर, थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात; ईथे पहा लाइव्ह

टॉसच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) मैदानावर उपस्थित राहणार आहेत. ते सामन्यादरम्यान कॉमेंट्रीही करू शकतात.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) चौथा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी म्हणेज आज सकाळी 9.30 वाजल्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. टॉसच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) मैदानावर उपस्थित राहणार आहेत. ते सामन्यादरम्यान कॉमेंट्रीही करू शकतात. दरम्यान, हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल. या कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now