Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 3 Live Streaming: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 59.4 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 44 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाने 143 धावांची आघाडी घेतली होती. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले. भारताला विजयासाठी 147 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात रोहित शर्माने आक्रमक पद्धतीने सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण एक चुकीचा फटका मारताना तो बाद झाला. त्यांने 11 चेंडूत 11 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहली हा देखील एक धाव करुन बाद झाला, यानंतर यशस्वी आणि सरफराज देखील स्वस्तात लागोपाठ बाद झाले. पाचव्या विकेटसाठी जाडेजा आणि पंतने भारतासाठी चांगली भागिदारी रचली. परंतू एजाज पटेलने जाडेजाला बाद करत ही भागिदारी तोडली. लंचनंतर पंतने काही चांगले शॉट खेळत धावसंख्या घावती ठेवली. मात्र एजाज पटेलच्या एका चेंडूवर पंत झेलबाद झाला. सध्या भारताची धावसंख्या 108 वर 7 अशी असून भारताला विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. तर हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 3 विकेटची आवश्यकता आहे,
पाहा पोस्ट -
3RD Test. WICKET! 21.4: Rishabh Pant 64(57) ct Tom Blundell b Ajaz Patel, India 106/7 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)