Team India Arrived In Harare: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी हरारेला पोहोचली, Watch Video

शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या संघातील काही खेळाडूंचाही या संघात समावेश आहे.

Team India Arrived In Harare:

Team India Arrived In Harare: झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया मंगळवारी हरारे येथे पोहोचली. यावेळचा संघाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताला पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे येथे होणार आहे. शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या संघातील काही खेळाडूंचाही या संघात समावेश आहे. मात्र, वादळामुळे ते सध्या बार्बाडोसमध्ये अडकून पडले आहेत, मात्र बाकीचे खेळाडू जे भारतात होते ते मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण (फक्त या दौऱ्यासाठी) सोबत झिम्बाब्वेला रवाना झाले. बार्बाडोसमध्ये अडकलेल्या खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. भारतात आल्यानंतर हे खेळाडू झिम्बाब्वेला जाणार आहेत. बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या 2 टी-20 सामन्यासाठी 3 नवीन खेळाडूंना बदली म्हणून पाठवले आहे. (हेही वाचा: Rohit, Kohli, Jadeja Farewell: BCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना विशेष फेअरवेल. पाहा पोस्ट)

पहा व्हिडिओ- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)