Team India Announced: न्यूझीलंड-बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर; जाणून घ्या कोणत्या खेळाडूला मिळाले स्थान

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ऋषभ पंतची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

बीसीसीआयने बांगलादेश आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे, तर हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत कर्णधार असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ऋषभ पंतची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. समितीने बांगलादेशविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले आहे. यावेळी काही नवीन खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. उमरान मलिका आणि शाहबाज अहमद हे संघात आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement