Team India Squad for Sri Lanka Tour: ब्रेकिंग! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार यादव टी-20 कर्णधार तर रोहितकडे वनडेचे कर्णधारपद कायम
सूर्यकुमार यादवला टी-20 मध्ये कर्णधार बनवण्यात आले आहे. तर शुभमन गिल उपकर्णधाराच्या भूमिकेत राहणार आहे. तर वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडे राहील. तो एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
Team India Squad for Sri Lanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला टी-20 मध्ये कर्णधार बनवण्यात आले आहे. तर शुभमन गिल उपकर्णधाराच्या भूमिकेत राहणार आहे. तर वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडे राहील. तो एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 27 जुलैपासून टी-20 मालिकेने होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर 2 ऑगस्टपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे.
भारताचा एकदिवसीय संघ श्रीलंका दौऱ्यावर:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
श्रीलंका दौऱ्यावर टी-20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी सुंदर, बी. अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)