Teacher Checking Papers at Stadium: क्रिकेट वेड! पाकिस्तानी शिक्षिकेने थेट स्टेडीयममध्ये लाईव्ह सामना पाहत चेक केले विद्यार्थ्यांचे पेपर (Watch Video)
महिला शिक्षीका मॅच मीस होऊ नये आणि तिचे पेपर चेकींगचे कामपण पूर्ण व्हावे यासाठी पेपर थेट कराची क्रिकेट स्टेडीयममध्ये घेऊन आली आणि मॅच पाहत पेपर चेक करत होती.
Teacher Checking Papers at Stadium: जगभरात क्रिकेटचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. सामना मीस होऊ नये यासाठी लोक काय करतील याचा नेम नसतो. असा एक प्रकार पाकिस्तान क्रिकेट लीगमधून (PSL 2025) समोर आला आहे. ज्यात महिला शिक्षीका मॅच मीस होऊ नये आणि तिचे पेपर चेकींगचे कामपण पूर्ण व्हावे यासाठी पेपर थेट कराची क्रिकेट स्टेडीयममध्ये घेऊन (Teacher Checking Papers at Stadium) आली आणि मॅच पाहत पेपर चेक करत होती. ती पेपर चेक करताना कॅमरामनने तिच्यावर कॅमरा थांबवला. शिक्षीका टिव्ही स्क्रीनवर दिसताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शिक्षीकाही स्वत:ला टिव्हीवर पाहून थक्क झाली आणि तिने तिचे चालू असलेले काम थांबवले. या घटनेवर कॉमेंटेटर यांनीही त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)