Taskin Ahmed: T20 विश्वचषकादरम्यान बांगलादेशच्या खेळाडूने केली मोठी घोडचूक, आता स्वत: केला खुलासा
नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील संघाने सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि अफगाणिस्तान यांच्याकडून तिन्ही सामने गमावले आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले.
बांगलादेश क्रिकेट संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील संघाने सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि अफगाणिस्तान यांच्याकडून तिन्ही सामने गमावले आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले. भारताविरुद्धचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते आणि बीसीबीच्या अधिकाऱ्याने आता खुलासा केला आहे की अशा महत्त्वाच्या सामन्याच्या दिवशी संघाचा उपकर्णधार तस्किन अहमद उशिरा झोपला आणि त्यामुळे संघ बस घेऊ शकला नाही. यानंतर आता तस्कीन अहमदने आपली बाजू मांडत आपण नाणेफेकीच्या अर्धातास पुर्वी मैदानात पोहचल्याचे सांगत तसेच टिम बस ही काही मिनीटांच्या अंतराने सुटल्याचे सांगितले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)