T20 World Cup 2021, IND vs AUS: कर्णधार रोहित शर्माने Virat Kohli कडे दिला चेंडू, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात गोलंदाजी करताना पाहून नेटकरी फिदा (Watch Video)
तर विराट कोहली गोलंदाज म्हणून हात आजमावताना दिसला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीत असमर्थतेमुळे संघ गोलंदाजीचा पर्याय शोधत आहे. विराट एक मध्यम वेगवान गोलंदाज आहे आणि तो संघातील पोकळी भरून काढू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती टीम इंडियाची (Team India) धुरा सोपवण्यात आली. तर विराट कोहली (Virat Kohli) गोलंदाज म्हणून हात आजमावताना दिसला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गोलंदाजीत असमर्थतेमुळे संघ गोलंदाजीचा पर्याय शोधत आहे. विराट एक मध्यम वेगवान गोलंदाज आहे आणि तो संघातील पोकळी भरून काढू शकतो. आतापर्यंत विराटने टी-20 सामन्याच्या 12 डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 198 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या आहेत.
विराटला 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यानंतर गोलंदाजी करताना पाहून नेटकरी देखील प्रभावित झाले.
विराट सहावा गोलंदाजी पर्याय?
विराट कोहली - परिपूर्ण टीम मॅन
फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण कर्णधार
पहा कोण गोलंदाजी करत आहे?
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)