T20 World Cup: टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; Jasprit Bumrah स्पर्धेतून बाहेर
बुमराहने या मालिकेत दोन सामने खेळले व यानंतर तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला.
टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबतची घोषणा केली आहे. लवकरच दुस-या खेळाडूची म्हणजेच बुमराहच्या बदलीची घोषणा केली जाईल. नुकतीच जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळली. बुमराहने या मालिकेत दोन सामने खेळले व यानंतर तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)