T20 World Cup 2022: भारताचा पराभव पाहण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने पार केल्या सर्व सीमा; म्हणाली- 'भारत हरला तर झिम्बाब्वेच्या मुलाशी करेन लग्न'

आगामी सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला, तर सहार झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेल, असे तिने म्हटले आहे.

Sehar Shinwari

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ICC T20 विश्वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सुपर-12 मध्ये पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. या संघाचा पुढचा सामना झिम्बाब्वेसोबत आहे आणि यासोबतच भारत उपांत्य फेरीत कोणत्या संघासोबत भिडणार हेही ठरवले जाईल. पण या सामन्याबद्दल पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीने एक ट्विट केले आहे, जे सध्या व्हायरल होत आहे.

आगामी सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला, तर सहार झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेल, असे तिने म्हटले आहे. सहार शिनवारीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले: ‘पुढील सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने भारताला चमत्कारिकरित्या पराभूत केल्यास मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now