Bismillah Jan Shinwari Passes Away: आंतरराष्ट्रीय अंपायर बिस्मिल्लाह (Bismillah Jan Shinwari) जन शिनवारी यांचा शनिवारी अफगाणिस्तानाच्या (Afghanistan) नांगरहार प्रांतात (Nangarhar Province) झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. 36 वर्षीय बिस्मिल्लाह यांनी अफगाणिस्तान आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम पाहिले आहेत. या अपघातात त्याच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला आहे. नांगरहार प्रांताचे राज्यपाल प्रवक्ता अताउल्लाह खोगयानी यांनी शनिवारी ही माहिती दिली. राज्यपालांच्या प्रवक्त्याने सांगितले की, नांगरहार प्रांतातील शिनवार जिल्ह्यात दुपारी 12:20 वाजता रस्त्यावर बॉम्बस्फोट झाला. पोलिस ठाण्यात घुसण्याच्या प्रयत्नात दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याची संध्या माहिती मिळत आहे. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तथापि, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाहीत.
दरम्यान, शिनवारी यांनी पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरची भूमिका बजावली आहे आणि 2017 च्या गाझी अमानुल्ला खान प्रादेशिक एकदिवसीय सामन्यात व 2017–18 च्या अहमद शाह अब्दाली 4 दिवसीय स्पर्धा जी अफगाणिस्तानात आयोजित करण्यात आली त्यात त्यांनी अंपायरची भूमिका बजावली होती. 36 वर्षीय अंपायरने इतर अनेक खेळांमध्येही कामगिरी बजावली होती. दरम्यान, या स्फोटाचा अफगाणिस्तानमधील अनेक लोकांवर परिणाम झाला. स्थानिक वृत्तानुसार, नांगरहार स्फोटात कमीतकमी 15 लोकांचा जीव गेला असून 30 जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी पूर्व प्रांताच्या नंगहरल्या घाणीखिल जिल्ह्यात जिल्हा राज्यपाल कंपाऊंडजवळ ही घटना घडल्याचे समजले जात आहे.
दुसरीकडे, नांगरहारच्या राज्यपाल कार्यालयाच्या प्रवक्त्याने या हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितले की बंदूकधारी जिल्हा गव्हर्नरच्या आवारात घुसायच्या प्रयत्नात होते परंतु सुरक्षा दलाने त्यांना ठार केले.