T20 WC 2021, IND vs PAK: सूर्यकुमार यादवचे फ्लॉप सत्र सुरूच, पाकिस्तानचा भारताला तिसरा झटका
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीने भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवला विकेटकीपर मोहम्मद रिझवानकडे झेलबाद केले. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिले फलंदाजी करत 6 ओव्हरमध्ये 36 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमारचे फ्लॉप सत्र यंदाही सुरूच राहिले. तो 8 चेंडूत 11 धावाच करू शकला.
टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) आपल्या पहिल्या सुपर-12 सामन्यात टीम इंडियाला (Team India) पॉवर-प्लेमध्ये तिसरा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीने (Hasan Ali) भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) विकेटकीपर मोहम्मद रिझवानकडे झेलबाद केले. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिले फलंदाजी करत 6 ओव्हरमध्ये 36 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)