ICC Rankings T20: सूर्यकुमार यादवची जबरदस्त कामगिरी, आईसीसी रैंकिंगमध्ये बाबर आझमला टाकले मागे

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Surya Kumar Yadav) या T20 च्या क्रमवारीत जबरदस्त फायदा झाला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) पुन्हा एकदा फटका बसला आहे.

ICC Rankings T20: सूर्यकुमार यादवची जबरदस्त कामगिरी, आईसीसी रैंकिंगमध्ये बाबर आझमला टाकले मागे
Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी पुन्हा टी-20 क्रमवारीत बरेच फेरबदल पाहायला मिळत आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Surya Kumar Yadav) या T20 च्या क्रमवारीत जबरदस्त फायदा झाला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) पुन्हा एकदा फटका बसला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान 825 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. बाबर आझमला हरवून तो नंबर वन बनला आणि तो कायम राखत आहे. क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर एडन मार्कराम आहे, ज्याचे 792 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादव आधीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर होता, मात्र आता तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे 780 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादवने बाबर आझमला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2022 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).